ग्रामपंचायत कार्यालय एरंडगाव भागवत मध्ये आपले स्वागत आहे...
आमचे गाव हे एक समृद्ध इतिहास आणि संस्कृती असलेले छोटे समुदाय आहे. अनेक पिढ्यांपासून येथे राहणारे कुटुंबे एकत्र येऊन एक मजबूत समुदाय तयार करतात.
शेतकी हे आमच्या गावाचे मुख्य व्यवसाय आहे. येथील उपजत धान्य, भाज्या आणि फळे या परिसरात प्रसिद्ध आहेत.
शिक्षण, आरोग्य आणि विकास या सर्व क्षेत्रांमध्ये आमचे गाव प्रगती करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही पारंपरिक मूल्यांना जपत आहोत.
एरंडगाव भागवत गावास मोठा ऐतिहासिक वारसा आहे हे गाव मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर आहे त्यावेळी मराठवाडा हा निजाम शाहीच्या अमलाखाली होता व पश्चिम महाराष्ट्र हा इंग्रजांच्या तेव्हा निजाम शाहीतील सैन्य या गावात येऊन ग्रामस्थांना तुटत असत त्या वेळी ग्रामस्थांनी मोठ्या हिम्मतीने सदर चौकीवर हल्ला करून सदर चौकी उध्वस्त केली व त्या नंतर निजाम सहीने त्या ठिकाणी चौकी बांधण्याची हिम्मत केली नाही.
एरंडगाव भागवत हे गाव जायकवाडी धरणाच्या लागत बसलेले पुनर्वसित गाव आहे या गावाची लोकसंख्या १७३४ असून गावास पिण्याच्या पाण्यासाठी व शेती करिता जायकवाडी जलाशयातील पाण्याचा वापर केला जात आहे. एरंडगाव भागवत हे गाव बागायत गाव समजले जाते
गावाची सामान्य माहिती
पाणीपुरवठा आणि स्वच्छता
१२
रस्ते आणि रस्त्यावरील दिवे
८, ८०
वाचनालये,खेळाचे मैदान
१, १